"बेस्ट अचीव्हर" पुरस्कार

Wednesday: 22 Feb 2012:

द लातूर क्लब द्वारा आयोजित " लातूर फेस्टिव्हल " मधे लातुरातील वेगवेगळ्या वयोगटातील मान्यवराना त्यांनी केलेल्या महनीय कार्या बद्दल सन्मानित करण्यात येते. यात जेष्ठ नागरिक, मध्यम वयीन नागरिक आणि तरुण वयीन नागरिक अशी वर्गवारी करण्यात येत असते.त्यांना अनुक्रमे 'लाईफ टाईम अचीव्हर', 'अचीव्हर' आणि 'यंग अचीव्हर ' अश्या पुरस्काराने भूषविले जाते.'प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असते.

यंदाच्या "लातूर फेस्टिव्हल २०१२" च्या पुरस्कारांसाठी

१: मा.श्री.जीवनधरजी शहरकर - आदर्श शिक्षक आणि जेष्ठ पत्रकार

२: मा.श्री.अनिल बोकील - प्रखात अर्थतज्ञ आणि 'अर्थक्रांती' प्रस्तावाचे प्रणेते व 'अर्थक्रांती प्रतिष्ठानचे ' अध्यक्ष

३ : मा.श्री.अमोल चिंते - तरुण क्रिकेटपटू

यांची निवड एकमताने करण्यात आली. लातुरातील विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी या निवड समितीचे सदस्य असतात.

केंद्रीय मंत्री मा. नामदार श्री.विलासराव देशमुख यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला

माननीय ना.श्री. विलासरावजी देशमुख यांच्या समोर "अर्ताक्रांती प्रस्तावाचे' सविस्तर सादरीकरण मागेच झालेले असल्याने 'अर्थक्रांती'प्रस्तावा'बद्दल त्यांनी अतिशय गौरवपूर्ण उदगार काढले . हा प्रस्ताव लागू झाल्यास देशात 'टू जी स्पेक्ट्रम ' सारख्या घोटाळ्यांना अजिबात स्थान राहणार नाही आणि देश कायम प्रगतीपथावर राहील असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले.

याच 'लातूर फेस्टिव्हल' द्वारा आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शनात "अर्थक्रांती'चा एक स्टोल लावण्यात आला होता ज्याला हजारोंच्या संख्येने लोकांनी भेट देवून 'अर्थक्रांतीची'संकल्पना जाणून घेतली.श्री.प्रशांत देशपांडे,श्री.विजय दबदगावकर ,श्री.अमोल जाधव, श्री. शिरीष कुलकर्णी, श्री.विश्वनाथ होलकुंडे आदी कार्यकर्त्यांनी याठिकाणी जनतेला मार्गदर्शन केले. याच बरोबर 'अर्थपूर्ण' या मासिका बद्दल हि लोकांना माहिती दिली व सभासदत्व घेण्याची विनंती केली. नजीकच्या भविष्यात 'अर्थपूर्ण'चा मोठा वाचक वर्ग तयार होण्याची खात्री या सर्व कार्यकर्त्यांना आहे.

खासदार श्री.जयंतराव आवळे, आमदार श्री.अमित देशमुख, आमदार श्री.विक्रम काळे, आमदार श्री.वैजनाथ शिदे, लातूर फेस्टिव्हल २०१२ चे अध्यक्ष श्री.शिरीष पोफळे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते..सुमारे १५ हजारांच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने हा पुरस्कार सोहळा पार पडला.

Author:
Shireesh Pophale, Latur