Wednesday: 28 Sept 2011:
गर्भर्शीमंतांनी अधिक कर सरकारला दिले पाहिजेत, असे जगातले दुसर्या- तिसर्या) क्रमांकाचे गर्भर्शीमंत वॉरेन एडवर्ड बफेट का म्हणत असतील? अमेरिकेवरील कर्ज आगामी 10 वर्षांत कमी करावयाचे असल्यास गर्भर्शीमंतांवर अधिक कर (वॉरेन बफेट कर) लावण्याशिवाय पर्याय नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी का म्हटले आहे? या विधानानंतर अमेरिकेत तथाकथित पुरोगामी करप्रणालीविषयी उलटसुलट चर्चा का सुरू झाली आहे? जगातील सर्वात मोठी अर्थसत्ता असलेल्या अमेरिकेवर कर्जबाजारी होण्याची वेळ का आली आहे? अमेरिकेतल्या आणि युरोपातील आर्थिक घडामोडींचे भारतासारख्या विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेवर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर परिणाम का होत आहेत? भारताच्या शेअरबाजाराला निश्चित दिशा का सापडत नाही? भारतातील महागाई आणि चलनवाढ रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या प्रयत्नांनंतरही कमी का होत नाही?
जग आणि भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी सर्वांच्याच मनामध्ये प्रश्नांची प्रचंड गर्दी झाली असून या प्रश्नांची थातुरमातुर उत्तरे देऊन अर्थतज्ज्ञ वेळ मारून नेत आहेत. या अर्थतज्ज्ञांना असा प्रश्न विचारण्याची गरज आहे की अर्थशास्त्राच्या नियमाने जग चालले आहे, तर जगाची आज ही दशा का झाली आहे? ही दशा होईपर्यंत हा खड्डा कोणाच्याच लक्षात कसा आला नाही? दशा झाल्यानंतर त्याची कारणे सांगण्यासाठी अर्थतज्ज्ञांची गरज नसून ती दशा वेळीच रोखण्यासाठी त्यांची गरज आहे. कारणे काहीही असो, तथाकथित तज्ज्ञांनी जगाच्या नागरिकांची घोर फसवणूकच केली आहे. जगामध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण करून त्या भीतीवर आपली पोळी भाजून घेण्याचे काम मोजक्या लोकांनी करून घेतले आहे.
आश्चर्य याचे वाटते की जेथे करप्रणाली अतिशय पुरोगामी मानली जाते, त्या अमेरिकेतही कोणत्या समूहाने किती कर भरावा, यावरून वादंग माजले आहे. अमेरिकेतील आर्थिक आकड्यांचा उलगडाही होत नाही, इतके ते आकडे मोठे असताना अमेरिकेवर ही वेळ यावी, याचा उलगडा आपल्याला होत नाही. उदाहरण म्हणून हे दोन-तीन आकडे पाहा: वॉरेन बफेट यांनी बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनला 30.7 अब्ज डॉलरची देणगी दिली होती. 2007 साली बफेट यांचे उत्पन्न 57.4 अब्ज डॉलर म्हणजे 2,620 अब्ज रुपये इतके होते.(महाराष्ट्राचे 2009-10 वर्षात एकूण उत्पन्न-एनएसडीपी 8 लाख 17 हजार 891 कोटी रु. होते) अमेरिकेला आगामी 10 वर्षांत 3 ट्रिलियन डॉलर वित्तीय तूट भरून काढायची आहे. या आकड्यांचा आपल्याला किती उलगडा होतो? पण हे प्रचंड आकडे सांगणारी अमेरिकाच आर्थिक संकटात सापडली आहे, हे मनाला अजिबात पटत नाही.
अमेरिकेतील करप्रणालीवर चर्चा सुरू केली ती बफेट यांनी. आपण जो कर भरतो, त्यापेक्षा आपल्या कंपनीतील अधिकारी जास्त कर भरतात, हे त्यांनी सांगितले तेव्हा अमेरिकेतील पुरोगामी करप्रणालीवर चर्चा सुरू झाली. आर्थिक साक्षरतेचे टोक गाठलेल्या अमेरिकेवर आलेली ही वेळ म्हणजे नामुष्कीच म्हटली पाहिजे. अमेरिका हा भांडवलशाहीची राजधानी, एकमेव महासत्ता आणि जगावर दादागिरी करणारा देश आहे, त्यामुळे त्या देशाशी आपल्यासारख्या देशाची तुलनाही होऊ शकत नाही, असे सर्वच जण म्हणतात, मात्र असे असताना तो देश संकटात सापडला आहे, हे तर नागडे सत्य आहे. या संकटाचे कारण शोधणारे आपण अर्थतज्ज्ञ नसलो तरी वॉरेन बफेट यांनी या विषयाला तोंड फोडल्यामुळे आणि ओबामा यांनीही त्याला दुजोरा दिल्यामुळे त्या पेचप्रसंगात आपणही ‘नाक खुपसायला’ हरकत नाही. त्याचे दुसरे कारण त्या घडामोडींचे भारतीयांच्या आयुष्यावरही परिणाम होताना आपण पाहत आहोत.
जगाला आज एका आदर्श करप्रणालीची गरज आहे. आदर्श करप्रणालीमध्ये समता (Equity), उत्पादकता (Productivity), सोपेपणा(Simplicity), लवचिकता (Elasticity), निश्चितता (Certainity) आणि किफायतशीरपणा (Economy) या तत्त्वांची काळजी घेतलेली असावीच लागते. मात्र या तत्त्वांचा अभाव असलेल्या करपद्धतीमुळेच जगात सध्याचा गोंधळ माजला आहे. भारतातील करप्रणालीला तर या दिशेने जाण्यासाठी आमूलाग्र बदलाची वाट धरावी लागणार आहे. ब्रिटिशांनी या देशाला लुटण्यासाठी तयार केलेल्या सध्याच्या करप्रणालीतून आपण कधी बाहेर पडणार हा प्रश्नच आहे.
आज येथे अमेरिकेतल्या करप्रणालीची चर्चा यासाठी केली की तेथे बदल झाला तरच आपल्याकडे तो बदल झाला पाहिजे, असे म्हणणार्या भाडोत्री सल्लागारांची सध्या चलती आहे. त्यामुळे भारतात काही बदल घडविण्यासाठी तो आधी अमेरिकेत झाला पाहिजे, अशी नामुष्की स्वतंत्र भारताला सहन करावी लागते आहे. अर्थक्रांती प्रतिष्ठानने (www.arthakranti.org) ‘बँक व्यवहार कर’(Transaction Tax) हा सिंगल पांॅइंट डिडक्शन टॅक्स सुचविला आहे. वर दिलेल्या आदर्श करप्रणालीच्या तत्त्वांचे निकष लावून पाहिल्यास आपल्याला या कराचे महत्त्व लक्षात येते. शिवाय काळ्या पैशाच्या निर्मूलनासाठीचा रामबाण उपाय म्हणूनही तो अतिशय परिणामकारक ठरणार आहे. सध्या भारतात जमा होणारा प्रत्यक्ष कर किती, अप्रत्यक्ष कर किती आणि बँक व्यवहार कर सुरू झाल्यानंतर आताचे सर्व कर रद्द करून किती प्रचंड महसूल सरकारकडे जमा होऊ शकतो, याची गणिते करून झाली आहेत. ज्यांना अधिक कुतूहल आहे, ते अर्थक्रांतीच्या वेबसाईटवर जाऊन ते तपासू शकतात. खरी चिंता याची वाटते की आदर्श करप्रणाली बफेट आणि ओबामाच्या कानात कोण सांगणार, त्यांना ती कधी पटणार आणि त्यांनी अंमलबजावणी केल्यावर अमेरिकाच आदर्श मानणारे आर्थिक सल्लागार ते भारत सरकारला सांगणार ना? आणि त्यांनी सांगितल्यावर तरी सरकार त्याचे अनुकरण करणार ना? तोपर्यंत जगात दर सहा माणसांमागे एक असे प्रमाण असलेल्या भारतीयांचे आयुष्य कोणत्या थराला पोचलेले असेल, याची कल्पनाही करवत नाही.
Author:
Yamaji Malkar (ymalkar@gmail.com)
* Taxes In India *
* Taxes In India *
* *
*1) Qus.: What are you doing?*
*Ans.: Business.*
*Tax : PAY PROFESSIONAL TAX*
* *
*2) Qus.: What are you doing in Business?*
*Ans.: Selling the Goods.*
*Tax : PAY SALES TAX*
* *
*3) Qus.: From where are you getting Goods?*
*Ans.: From other State/Abroad*
*Tax : PAY CENTRAL SALES TAX, CUSTOM DUTY & OCTROI*
* *
*4) Qus.: What are you getting in Selling Goods?*
*Ans.: Profit.*
*Tax : PAY INCOME TAX*
* *
*5) Qus.: How do you distribute profit ?*
*Ans : By way of dividend*
*Tax : PAY DIVIDEND DISTRIBUTION TAX*
* *
*6) Qus.: Where you Manufacturing the Goods?*
*Ans.: Factory.*
*Tax : PAY EXCISE DUTY*
* *
*8) Qus.: Do you have Staff?*
*Ans.: Yes*
*Tax: PAY STAFF PROFESSIONAL TAX*
* *
*9) Qus.: Doing business in Millions?*
*Ans.: Yes*
*Tax : PAY TURNOVER TAX?*
*Ans : No*
*Tax : Then pay Minimum Alternate Tax*
* *
*10) Qus.: Are you taking out over 25,000 Cash from Bank?*
*Ans.: Yes, for Salary.*
*Tax : PAY CASH HANDLING TAX*
* *
*11) Qus.: Where are you taking your client for Lunch & Dinner?*
*Ans.: Hotel*
*Tax : PAY FOOD & ENTERTAINMENT TAX*
* *
*12) Qus.: Are you going Out of Station for Business?*
*Ans.: Yes*
*Tax : PAY FRINGE BENEFIT TAX*
* *
*13) Qus.: Have you taken or given any Service/s?*
*Ans.: Yes*
*Tax : PAY SERVICE TAX*
* *
*14) Qus.: How come you got such a Big Amount?*
*Ans.: Gift on birthday.*
*Tax : PAY GIFT TAX*
* *
*15) Qus.: Do you have any Wealth?*
*Ans.: Yes*
*Tax : PAY WEALTH TAX*
* *
* *
*16) Qus.: To reduce Tension, for entertainment, where are you going?*
*Ans.: Cinema or Resort.*
*Tax : PAY ENTERTAINMENT TAX*
* *
*17) Qus.: Have you purchased House?*
*Ans.: Yes*
*Tax : PAY STAMP DUTY & REGISTRATION FEE*
* *
*18) Qus.: How you Travel?*
*Ans.: Bus*
*Tax : PAY SURCHARGE*
* *
*19) Qus.: Any Additional Tax?*
*Ans.: Yes*
*Tax : PAY EDUCATIONAL, ADDITIONAL EDUCATIONAL & *
*SURCHARGE ON ALL THE CENTRAL GOVT.'s TAX !!!*
* *
*20) Qus.: Delayed any time Paying Any Tax?*
*Ans.: Yes*
*Tax : PAY INTEREST & PENALTY*
* *
*21) INDIAN : Can I die now??*
*Ans : No, wait we are about to launch the FUNERAL TAX*
*
--------------------------------------------------------------------------------------------------
*
*What a Great job from Govt. of India …*
Warren Buffet
I think Arthakranti should propose this scheme to American Govt, Naturally after getting the patent for the same. To the best of my knowledge Arthakranti was in process to file the patent. If india wants to get the ideas from America, even that route is better. And about life of indian.... let us try, and continue the efforts that life tomorrow will be better than today...
Warren Buffet email
Hi..
I read the artical and this make my belief in Arthakranti more strong.
I just searched google and found email of Warren Buffet.
berkshire@berkshirehathaway.com
We need to be sure and can find more details about this email.
may be we can send him the mail and send Arthakranti details in English ?